सैनिक कल्याण विभागात करार पद्धतीने विधी सल्लागार नेमणुकीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : सैनिक कल्याण विभागात करार पद्धतीवर एक विधी सल्लागाराची नेमणूक करावयाची असल्याने पात्र व इच्छुक व्यक्तिंनी ४ मे पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन सैनिक कल्याण विभागाचे संचालक ब्रिगेडियर (निवृत्त) राजेश गायकवाड यांनी केले आहे

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांची विविध प्रकारची न्यायालयीन प्रकरणे उच्च न्यायालय, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण खंडपिठ मुंबई, नागपूर, औरंगाबाद, सशस्त्र सेना न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ, औद्योगिक, कामगार न्यायालय, जिल्हा सत्र, दिवानी व इतर न्यायालयामध्ये चालू असतात. या प्रकरणांचा वेळेत निपटारा करण्याकरिता विधि सल्लागाराची नेमणूक करावयाची आहे.

विधि सल्लागाराच्या नेमणुकीसाठी विधी सल्लागार पदावरून सेवा निवृत्त झालेले अनुभवी अधिकारी, कर्मचारी किंवा विधीची पदव्युत्तर पदवी धारण केलेली किंवा प्रत्यक्ष वकीलीचा १० वर्षाचा अनुभव व असावा.

इच्छूक उमेदवारांनी नेमणुकीच्या अटी व शर्ती तसेच अधिक माहितीसाठी संचालक, सैनिक कल्याण विभाग, रायगड इमारत, राष्ट्रीय युद्ध स्मारकासमोर, घोरपडी, पुणे- ४११००१, दुरध्वनी क्रमांक ०२०-२६३०२६०३ येथे संपर्क साधावा, असेही सैनिक कल्याण विभागाकडून कळविण्यात आले आहे.

See also  महसूलविषयक सुधारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी १५ ऑगस्टपासून- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस