निमगाव : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर, जि. पुणे) येथे जय जवान माजी सैनिक संघटनेचा २२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा व आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी आदर्श सरपंच भास्करराव पेरे साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या दिपालीताई राहुल गव्हाणे, पंचायत समिती सदस्य विजयदादा रणसिंग, माजी सरपंच हनुमंत काळे, बापूसाहेब काळे, राजेंद्र विधाटे,निमगाव म्हाळुंगीचे पोलीस पाटील किरण काळे,सरपंच सचिन चव्हाण तसेच मा. लेफ्टनंट कर्नल तानाजी होगे, मा. श्री. शिवाजीराव कदम (अध्यक्ष माजी सैनिक फेडरेशन महाराष्ट्र), मा. ऑनरेरी कॅप्टन परशुराम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वर्धापन दिनानिमित्त शिवराज्य प्रतिष्ठान व हरे राम हरे कृष्णा संस्थेच्या वतीने मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी शरद रासकर यांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हवालदार लक्ष्मण शिवले यांनी केले. सूत्रसंचालन रोहिदास खेडकर व सरपंच राजेंद्र विधाटे यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव सुभेदार चंद्रकांत चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे भास्करराव पेरे साहेब यांनी आपल्या मनोगतातून माजी सैनिकांच्या कार्याचे कौतुक करत ग्रामविकासासाठी एकजुटीने काम करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी तरुणांनी शिस्त, देशभक्ती आणि समाजसेवेची भावना जोपासावी असे मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थितांना नवी दिशा मिळाली.
तसेच संघटनेचे अध्यक्ष सुभेदार रामचंद्र विधाटे, उपाध्यक्ष हवालदार लक्ष्मण शिवले, सचिव सुभेदार चंद्रकांत चव्हाण, सदस्य हवालदार भाऊसाहेब वाडे, सुभेदार बाळासाहेब घोलप, हवालदार नामदेव चव्हाण, हवालदार मारुती चौधरी, वॉरंट ऑफिसर शंकर लांडगे, हवालदार लक्ष्मण हुसाळे, सौ. सुनिता बाबासाहेब मराठे व इतर पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी जय जवान माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, माता-भगिनी तसेच निमगाव म्हाळुंगी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात आले.















