रणवीर हनुमान तरुण मंडळ औंध येथे बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

औंध : मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने रणवीर हनुमान तरुण मंडळ, वरची तालीम, औंध यांच्या वतीने मंडळाच्या १११ व्या वर्षानिमित्त बाल चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला परिसरातील बालकलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेत विविध वयोगटांतील अनेक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत आपली कलाकौशल्ये सादर केली. स्पर्धेसाठी गणपती बाप्पा आणि गणेश विसर्जन मिरवणूक यांसह विविध विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी रंगांचा कल्पक वापर करून आकर्षक व सुंदर चित्रे साकारली.

स्पर्धेतील उत्कृष्ट चित्रांची निवड करून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला.

या उपक्रमामुळे मुलांच्या कलात्मक गुणांना व्यासपीठ मिळाले असून, त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळाली. पालकांनीही रणवीर हनुमान तरुण मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

See also  निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ; खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित