नवीन मंत्रिमंडळामध्ये आणखी किती कोटीचा भ्रष्टाचार करण्याचा टार्गेट अजित पवार यांनी ठेवला आहे – रेखा ठाकूर

मुंबई : पाटबंधारे मंत्री असताना अजित पवारांनी 70 हजार कोटीचा सिंचन घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे अनेक नेते करत होते. परंतु या आरोपाला माफ करण्याचं काम फडणवीस यांनी केलं. त्यानंतर अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील अजित पवारांवर 70 हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले. मात्र दोन दिवसांमध्ये घडामोडी पाहता मंत्रिमंडळामध्येअजित पवारांना विकासाच्या अजेंड्यावरती सामील करून घेण्याचं काम झालेलं आहे. आणि त्यांचे हे जे काही भ्रष्टाचार आहेत घोटाळे आहेत त्यांना माफ करण्याचं काम फडणवीस यांनी केलेलं आहे.

आता नवीन मंत्रिमंडळामध्ये आणखी किती कोटीचा भ्रष्टाचार करण्याचं टार्गेट अजित पवार यांनी ठेवलेलं आहे ते त्यांनी जनतेला स्पष्ट करावं असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी उपस्थित करत भाजपावर टीका केली.

See also  आप ची राज्य समिती बरखास्त, नव्याने संघटन बांधणी होणार!