कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या त्यागामुळे  शिक्षणाची चळवळ सर्वत्र पोहोचली – पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील

पुणे : शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या त्यागामुळे शिक्षणाची चळवळ खेड्यापाड्यासह सर्वत्र पोहोचली. असे प्रतिपादन पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांनी आज शनिवारी धायरी फाट्यावरील नारायणराव सणस विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६७ व्या पुण्यतिथी कार्यक्रमात बोलताना केले.

महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुणे जिल्हा काँग्रेसच्या वतीने पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी बोलताना चव्हाण पाटील म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या त्यागामुळे खेड्या पाड्यासह सर्वत्र शिक्षणाची चळवळ पोहोचली आहे. गोरगरीब, कष्टकऱ्यांच्या मुला मुलींत  शिक्षणा बरोबर राष्ट्रीय सेवावृत्तीची  भावना त्यांनी रुजवली. आजही त्यांची शिकवण प्रेरणादायी आहे.

पुण्या पासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावरील वडगाव धायरी हिंगणे परिसरात माध्यमिक शिक्षणाची सोय नसताना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी धायरी फाट्यावर रयत शिक्षण संस्थेचे विद्यालय सुरू केले. विद्यालयासाठी  बापुसाहेब सणस यांनी दोन एकर जमीन बक्षीस दिली. विद्यालयाचे भुमिपुजन  कर्मवीर भाऊराव पाटील व संत गाडगे महाराज यांच्या हस्ते करण्यात आले होते. या आठवणींना शाळेचे वयोवृद्ध माजी विद्यार्थी भिकाजी कोकाटे, लायगुडे, पोकळे आदींनी उजाळा दिला.

See also  नृसिंह हायस्कूल सांगवी येथे माजी विद्यार्थ्यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन