मनोज जरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार रोहित पवार यांचा एक दिवस अन्नत्याग

पुणे: मराठा समाजाला संवैधानिक पद्धतीने आणि टिकणारं आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे-पाटील हे अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. त्यांना आणि मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून युवा संघर्ष यात्रा सुरू असताना उद्या (गुरुवार) एक दिवस आमदार रोहित पवार अन्नत्याग करणार असल्याचे सांगितले.

राज्यातील युवांच्या प्रश्नांवर राज्यव्यापी युवा संघर्ष यात्रा सुरु करण्यात आली आहे. यात्रा सुरू असताना मराठा समाजासाठी मनोज जरंगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले असल्याने त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी एक दिवस अन्यथा करणार असल्याचे सांगितले.

See also  शरदचंद्र पवार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे घंटानाद आंदोलन शिक्षण वाचवण्यासाठी सरकार बदलण्याचे आवाहन