AI युगासाठी तयारी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रसेविका समितीची पुण्यात कार्यशाळा

पुणे, प्रतिनिधी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रसेविका समिती, विद्यापीठ भाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “AI युगासाठी तयारी” या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन १४ जून रोजी औंध येथील भीमसेन जोशी प्रेक्षागृहात करण्यात आले. संघ स्वयंसेवक, सेविका आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित या कार्यशाळेला ३५० हून अधिक जणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यशाळेची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेस वंदन आणि दीपप्रज्वलनाने झाली. दीपप्रज्वलन संघचालक श्री. सुभाष कदम, AI सल्लागार व COEP चे अतिथी प्राध्यापक डॉ. योगेश कुलकर्णी तसेच MIT-WPU येथील Institute of AI चे संचालक डॉ. आनंद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यशाळेची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेस वंदन आणि दीपप्रज्वलनाने झाली. दीपप्रज्वलन संघचालक श्री. सुभाष कदम, AI सल्लागार व COEP चे अतिथी प्राध्यापक डॉ. योगेश कुलकर्णी तसेच MIT-WPU येथील Institute of AI चे संचालक डॉ. आनंद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख वक्ते डॉ. योगेश कुलकर्णी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील विकासक्रम उलगडून सांगताना Predictive AI, Generative AI आणि Agentic AI या टप्प्यांची सविस्तर माहिती दिली. आजच्या काळात AI साक्षरता ही अत्यावश्यक असल्याचे सांगत प्रत्येकाने आपल्या कामात AI चा प्रभावी वापर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. AI मुळे काही नोकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता असली तरी नव्या रोजगार संधीही निर्माण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रमुख वक्ते डॉ. योगेश कुलकर्णी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील विकासक्रम उलगडून सांगताना Predictive AI, Generative AI आणि Agentic AI या टप्प्यांची सविस्तर माहिती दिली. आजच्या काळात AI साक्षरता ही अत्यावश्यक असल्याचे सांगत प्रत्येकाने आपल्या कामात AI चा प्रभावी वापर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. AI मुळे काही नोकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता असली तरी नव्या रोजगार संधीही निर्माण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

See also  राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भारती विद्यापीठाला प्रथम क्रमांकावर आणण्याकरीता प्रयत्न करावे-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

AI च्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचाही त्यांनी उल्लेख केला. AI प्रणालींसाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जा आणि शीतकरण यंत्रणेची आवश्यकता भासत असल्याने भविष्यात ऊर्जा व्यवस्थापन हे मोठे आव्हान ठरू शकते, असे त्यांनी सांगितले.

यानंतर डॉ. योगेश कुलकर्णी आणि डॉ. आनंद कुलकर्णी यांच्यात गटचर्चा आयोजित करण्यात आली. या चर्चेचे संयोजन श्री. ओंकार पांडे यांनी केले. AI हे केवळ तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी नसून सर्वसामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांनाही ते सहज वापरता येऊ शकते, असा विश्वास दोन्ही तज्ज्ञांनी व्यक्त केला.

पुढील काही वर्षांत एंट्री-लेव्हल सॉफ्टवेअर अभियंत्यांच्या नोकऱ्यांवर AI चा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेतृत्व, सिस्टीम डिझाईन आणि समस्या निराकरण कौशल्यांवर भर द्यावा, असे मार्गदर्शन करण्यात आले. अनुभवी IT व्यावसायिकांनी Domain Expert किंवा Product Manager म्हणून स्वतःला विकसित करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

AI क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी गणित आणि संगणकीय प्रोग्रॅमिंगमध्ये भक्कम पाया तयार करावा. कोणत्याही शाखेत शिक्षण घेत असले तरी AI विषय गौण (Minor) म्हणून अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच ‘Vibe Coding’ आणि ‘Vibe Debugging’ यापेक्षा मूलभूत प्रोग्रॅमिंग कौशल्यांवर भर देण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला.

कार्यशाळेत आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने स्वदेशी AI तंत्रज्ञान विकसित करण्याच्या गरजेवर विशेष भर देण्यात आला. परदेशी तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करून भारताने स्वतःच्या AI प्रणाली विकसित करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

कार्यशाळेचा समारोप IT मिलन भाग प्रमुख श्री. मनोज सिंग यांनी केला. AI मुळे नोकऱ्या जाण्याबाबत अनावश्यक भीती बाळगण्याचे कारण नसून, मानवाकडे प्रत्येक तांत्रिक आव्हानाचा सामना करण्याची क्षमता असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मान्यवर पाहुणे म्हणून श्री. तरुण मालवीय (Co-founder & CEO, Mithi.com), श्री. मनीष देशपांडे (Co-Founder, 3More Technologies), श्री. युवराज जोशी, श्री. प्रवीण ओझा (CTO, EPAM Solutions) आणि श्री. सुमित वाणी (Director, HSBC) उपस्थित होते. त्यांचा श्री. सुभाष कदम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

See also  खोदा पैसे कमवा आणि पुन्हा खोदा; पुणे महानगरपालिकेच्या विभागांमध्ये समन्वयाचा अभाव

कार्यशाळेची सांगता राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’च्या समूहगायनाने करण्यात आली.