कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांचा शिवसेना युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सत्कार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदी डॉ. सुरेश गोसावी यांची निवड झाल्याबद्दल शिवसेना युवा सेना पुणे शहराच्या वतीने पुणे विद्यापीठात शिवसेना युवा सेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शुभेच्छा पर भेट व सत्कार करण्यात आला. आध्यक्रातिंविर लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष बाप्पु डाकले, उपाध्यक्ष बाळासाहेब भांडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी मुळशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम गायकवाड, म्हाळुंगे गावचे सरपंच युवा सेना उपशहर प्रमुख पुणे मयुर भांडे, विजय डाकले, सचिन डाकले, मंगेश बलकवडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात राहण्यासाठी व्यवस्था वाढवण्यात यावी तसेच त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य मागणी यावेळी मयूर भांडे यांनी केली.

See also  मुळशीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बदलापूर घटनेचा विरोध