स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त प्रभाग ८ व ९ मध्ये ‘स्वच्छता सप्ताह’ अभियानाची सुरुवात

औंध : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री व लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या “स्वच्छता सप्ताह” उपक्रमांतर्गत प्रभाग क्रमांक ८ व ९ मध्ये विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या अभियानाअंतर्गत प्रभागातील प्रमुख रस्ते, अंतर्गत गल्ल्या तसेच सार्वजनिक परिसरांची सखोल स्वच्छता करण्यात आली. आगामी काळात हे “स्वच्छता सप्ताह” अभियान सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असून प्रभाग क्रमांक ८ व ९ मधील सर्व रस्ते, प्रत्येक गल्ली आणि परिसर स्वच्छ करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी स्थायी समिती सदस्य अमोल बालवडकर यांनी सांगितले की, “स्वच्छ, सुंदर आणि निरोगी पुणे” घडविण्याच्या संकल्पाला बळ देणारा हा उपक्रम असून, यामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती होऊन लोकसहभाग अधिक वाढेल, असा विश्वास आहे.

या प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर, प्रभाग समिती अध्यक्षा रोहिणी चिमटे, स्थायी समिती सदस्य अमोल बालवडकर, नगरसेवक बाबुराव (आप्पा) चांदेरे, नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका भक्ती गायकवाड, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्याध्यक्ष वैशाली कमाजदार, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहआयुक्त विजय नायकल, तसेच औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील एस.आय., डी.एस.आय. आणि सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनीही परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

See also  बाणेर मधील बाटा शोरूम मागील लेनमधील अनधिकृत पार्किंगची पोलीस अधिकारी व माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर यांची पाहणी