वडगावात महाविकास आघाडीचे आंदोलन

धायरी — दिल्ली येथे जंतरमंतर वर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलन कर्त्यांवर अमानुषपणे केलेल्या लाठीचार्जच्या निषेथार्थ सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक हायवे उड्डाणपुला खाली महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलन कर्त्यांनी केली.

पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लहू निवंगुणे , मा.आमदार दीप्ती चौधरी, मा.आमदार मोहन जोशी, नगरसेवक काकासाहेब चव्हाण, नगरसेविका अनिता इंगळे,त्रिंबक मोकाशी,स्वाती पोकळे ,मिलिंद पोकळे, भरत कुंभारकर पाटील, अवधूत मते,सागर मारणे आबा जगताप, सुरेश मते, विशाल पवार, संजय अभंग,,तानाजी पवळे, बुवा खाटपे, महेश मते, धनंजय पाटील ,व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  मानवी वस्त्यांमधील कबुतरखान्यांचे मोकळ्या जागेत स्थलांतर करावे - शाकाहार, अहिंसावादी कार्यकर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांचे आवाहन