पुणे : दीपावलीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आकाशकंदिलाची रचना फुलांच्या सजावटीत करण्यात आल्याने अत्यंत लक्षवेधी झाली आहे .
ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, वसुबारसेपासून सुरु झालेल्या दीपावलीच्या मंगलमय पर्वाची सांगता तुळशीविवाह सोहळ्याने संपन्न होते. त्यामुळे मंदिरात दीपोत्सव, अन्नकोट यांसह धार्मिक कार्यक्रम देखील आयोजित केले आहेत . भाविकांसाठी स्वहस्ते अभिषेकाची सुविधाही उपलब्ध असल्याने अनेक भाविक या मंगलपर्वात श्रीं ना अभिषेक करीत नतमस्तक होतात.
















