झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

पुणे : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांच्या काकडे बीझ आयकॉन, गणेशखिंड रोड, शिवाजीनगर येथील कार्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा ८० वा वर्धापन दिन शनिवारी (दि. १५ ऑगस्ट) उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांच्या हस्ते सकाळी ७.४५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले.

कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी अर्चना यादव, सचिन गोसावी, सुनील बल्लाळ, उपसंचालक लेखा शैलेंद्र पाटील, तहसीलदार राजेश जाधव, रमेश पाटील, प्राजक्ता घोरपडे, गीता दळवी तसेच उपअधीक्षक भूमी अभिलेख नितीन वाडकर यांच्यासह प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत देशाच्या विकासासाठी तसेच झोपडपट्टी पुनर्वसनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित व सन्मानजनक निवारा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधिकरणाच्या कार्याला अधिक गती देण्याचा संकल्प व्यक्त केला.

See also  ब्लॅक या पबच्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले;  शहरात सर्वत्र कडकपणे कायदा, सुव्यवस्था राखावी- खासदार मेधा कुलकर्णी यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी