चंद्रकांत मोकाटे यांच्यासाठी माजी स्थायी समिती अध्यक्ष शिवा मंत्री व महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी एरंडवाना परिसरात प्रचार केला

कोथरूड : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांना कोणत्याही परिस्थितीत विधानसभे वर पाठवून कोथरूड विधानसभा मतदार संघाचा विकास करायचंच असा निर्धार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व माजी नगरसेवक शिवा मंत्री, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व आपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.


शिवा मंत्री यांच्याबरोबर शिवसेना शहर उपाध्यक्ष राजेश पळसकर, उमेश कंधारे, हेमंत धनवे, विजय रावडे, योगेश तापकीर, देविदास पवार, भगवान कडू, गिरीश गुरनानी, आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ( शरद पवार गट ), गोविंद थरकुडे, विनायक सूर्यवंशी, जितेंद्र भालेराव, अण्णा गोसावी, अनंत हुलावळे, कांता हुलावळे, राम बाटुंगे, अनिल भिलारे, अमर शिंदे, वैभव दिघे, कृष्णा नाकते, दिनेश पेंढारे, कैलास मोरे सुनिल तेलंग आदी दररोज श्री मोकाटे यांच्या प्रचारासाठी एरंडवणा परिसरात व सोसायटीत फिरत आहेत.


पांडुरंग कॉलनी, एरंडवणा गावठाण, गणेश नगर, चाळ क्रमांक 1,3,7, 10, नवसह्याद्री सोसायटी, पटवर्धन बाग, ta थवडे उद्यान, आदी परिसरात श्री मंत्री, कळस्कर कंधारे कडू गेल्या काही दिवसापासून दररोज सोसायटी व गावठाण परिसरात प्रचार करत फिरत आहे. ते या परिसरातील नागरिकांना व रहिवाशांना चंद्रकांत मोकाटे यांनी केलेल्या विकासाच्या कामांची माहिती देऊन श्री मोकाटे यांना संधी देण्याचे आवाहन करतात. या सर्वाबरोबर संवाद साधत असताना ते ज्या भागात प्रचारासाठी गेले त्या परिसरातील नागरिक व रहिवासी त्यांच्याशी संवाद साधताना सांगतात की, वाहतुकीची कोंडी व समस्या मोठया प्रमाणात आहे. अनेक सोसायटी व गावठाण व परिसरात रस्त्यांची दुर्देषा झाली आहे. लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासन रस्ते दुरुस्त करण्यास टाळत असल्याचे दावा नागरिक कार्यकर्त्यांशी बोलताना करतात. स्वछता व आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. सोसायटी मध्ये काही कामांची समस्या जाणवत आहे. अनियमित पाणीपुरवठा, महागाई, आदी समस्याकडे दुर्लक्ष होत आहे. या प्रश्ना ऐवजी धार्मिक मुद्दे व अन्य प्रश्नाकडे लक्ष वेधले जात असल्याचे नागरिकांनी या सर्वांशी बोलताना सांगितलं.

See also  शेतकरी आठवडे बाजार की ,कार्यकर्त्यांना " पॉकेट मनी "साठी राजकीय नेत्यांकडून करून दिलेली सोय