भिडेवाडा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या कामाची मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी

पुणे : पुणे शहरातील पेठ बुधवार येथील भिडेवाडा परिसरात उभारण्यात येत असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी भेट देऊन सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्मारकाच्या कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.

या स्मारकासाठी सुमारे २७२.५७ चौ.मी. क्षेत्रफळाची जागा उपलब्ध असून, एकूण १,११४.५५ चौ.मी. बांधकाम क्षेत्र प्रस्तावित आहे. यासाठी अंदाजित ३५ कोटी रुपयांची प्रकल्पीय तरतूद करण्यात आली आहे.स्मारकाच्या बांधकामांतर्गत आर.सी.सी. काम, स्टील स्ट्रक्चर, वीट बांधकाम तसेच इमारतीच्या आतील व बाहेरील प्लास्टरची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच फॉल्स सिलिंग फ्रेमिंग आणि अग्निशमन यंत्रणेची कामेही पूर्ण झाली आहेत. इमारतीमधील विद्युतविषयक कामे तसेच ऑडिओ-व्हिडिओ शो आणि होलोग्राफी यंत्रणेची कामे सध्या सुरू आहेत.

स्मारकाच्या बांधकामांतर्गत आर.सी.सी. काम, स्टील स्ट्रक्चर, वीट बांधकाम तसेच इमारतीच्या आतील व बाहेरील प्लास्टरची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच फॉल्स सिलिंग फ्रेमिंग आणि अग्निशमन यंत्रणेची कामेही पूर्ण झाली आहेत. इमारतीमधील विद्युतविषयक कामे तसेच ऑडिओ-व्हिडिओ शो आणि होलोग्राफी यंत्रणेची कामे सध्या सुरू आहेत.

भिडेवाडा येथील या स्मारकामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित माहिती आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे. स्मारकातील घुमटांमध्ये त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित थीमबेस्ड ऑडिओ-व्हिडिओ शो तसेच होलोग्राफीच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा इतिहास उलगडण्यात येणार आहे.

याशिवाय त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित माहितीपट व दृश्यश्राव्य माध्यमातून माहिती प्रदर्शित करण्यात येणार आहे. मुली व महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र, ग्रंथालय, मार्गदर्शन केंद्र, संगणक केंद्र तसेच ॲम्फीथिएटर यांसारख्या सुविधाही स्मारकात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या स्मारकाच्या उभारणीसाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून, दृश्यश्राव्य यंत्रणा व होलोग्राफीच्या कामांसाठी तज्ज्ञ समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी मा. पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम, मा. शहर अभियंता श्री. अनिरुद्ध पावसकर, मा. अधीक्षक अभियंता (भवन विभाग) श्री. बिपिन शिंदे, मा. उपायुक्त श्री. अविनाश संकपाळ तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

See also  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बनावट पदवी प्रमाणपत्र रॅकेटचा संशय; रिक्षाचालकाचा गंभीर दावा, चौकशी सुरू