द औंध सोशल फाउंडेशन आयोजित औंध-बोपोडीत NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे :  प्रभाग क्र. ८ औंध-बोपोडी परिसरात नगरसेविका भक्तीताई अजित गायकवाड, पुणे महानगरपालिका व द औंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत सुभाषदादा गायकवाड यांच्या वतीने NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर १९ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट असे ५ दिवस द औंध सोशल फाउंडेशन कार्यालय येथे सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत सुरू राहणार आहे.

शिबिराच्या पहिल्या दिवशीच जेष्ठ नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नोंदणी करून घेतली. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. पीएमपीएमएल बस, मेट्रो व इतर सार्वजनिक वाहतुकीसाठी उपयुक्त असलेले हे NCMC (National Common Mobility Card) – वन नेशन वन कार्ड नागरिकांना एकाच कार्डवर प्रवासाची सुविधा देते.

या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भक्तीताई गायकवाड व अभिजीत गायकवाड यांनी केले आहे.

See also  औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत हर घर तिरंगा मोहीम नुसार हर घर तिरंगा, हर घर स्वछता, स्वतंत्रता का  उत्सव स्वछता के संग  या अभियाना अंतर्गत  स्वच्छता मोहीम