बेरोजगारीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची ‘बेरोजगार हक्क एल्गार – तिरंगा टू-व्हीलर रॅली’

पुणे : राज्यातील वाढती बेरोजगारी आणि शिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार, पुणे शहराच्या वतीने गुरुवार, दि. २७ ऑगस्ट रोजी ‘बेरोजगार हक्क एल्गार – तिरंगा टू-व्हीलर रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे.

ही रॅली सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे पोहोचणार आहे. माजी मंत्री जयंत पाटील आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

शिक्षण पूर्ण करून रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो तरुणांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तसेच युवकांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यासाठी ही रॅली काढण्यात येणार आहे. “रोजगार हा उपकार नाही, तर युवकांचा अधिकार आहे. तरुणांच्या भविष्याच्या प्रश्नावर सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत,” अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर नेतृत्वाने केली आहे.पुणे शहराध्यक्ष विशाल तांबे, श्रीकांत पाटील आणि ज्येष्ठ नेते सोपान ऊर्फ काका चव्हाण यांनी पुणे शहरातील युवक, विद्यार्थी, बेरोजगार तरुण-तरुणी तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

पुणे शहराध्यक्ष विशाल तांबे, श्रीकांत पाटील आणि ज्येष्ठ नेते सोपान ऊर्फ काका चव्हाण यांनी पुणे शहरातील युवक, विद्यार्थी, बेरोजगार तरुण-तरुणी तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

See also  बाणेर बालेवाडी मध्ये मोफत शस्त्रक्रिया करणारे पालिकेचे हॉस्पिटल हवे