‘मस्ती करायची नाही’…  आमदार शंकर मांडेकर यांच्या समोरच हिंजवडी पोलिसांची ग्रामस्थांना दादागिरी; व्हिडीओ व्हायरल

हिंजवडी : हिंजवडीत आय.टी. पार्क वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांनी अंतर्गत रस्ते रुंद करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. दरम्यान, ग्रामस्थानी हिंजवडी ,माण परिसरातील रस्ते रुंदीकरणासाठी पोलिस बळाचा वापर केल्या जात असल्याचा आरोप केला. याचा प्रत्यय समोर आलेल्या एका व्हिडीओतून आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आमदार शंकर मांडेकर यांच्या समोरच हिंजवडी पोलिसांनी ग्रामस्थांना दादागिरी केल्याचे दिसते.

हिंजवडी, माणमधील अंतर्गत रस्ते रुंद करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या, त्यानुसार पीएमआरडीए प्रशासनाने अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याच्या कारवाईला सुरुवात देखील केली. मात्र कोणतेही नोटीस न देता बांधकामे पाडण्यासाठी का आलात असा जाब विचारणाऱ्या एका नागरिकासोबत पोलिसांनी दादागिरी केली.

हिंजवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस बालाजी पांढरे यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ धक्के मारत अटक करण्याची धमकी दिल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या समोर हा प्रकार घडला. मात्र, त्यांनीयामध्ये कोणताही हस्तक्षेप केला नाही. पोलिसांच्या अशा दादागिरी समोर गप्प बसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे . या घटनेचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असल्याने हिंजवडी माण ग्रामस्थांमध्ये पोलिस आणि पीएमआरडीए प्रशासनात वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

See also  औंध परिसरातील अवैद्य रीतीने राहणाऱ्या EWS इमारतीमधील भाडेकरूंवर कारवाईची मागणी