मुळशीतील पौड या गावात पहाटे घरफोडी सोने वस्तू व 40 हजार रुपयांची रोकड लंपास

पौड : मुळशी तालुक्यात पौड या गावांमध्ये गुरुवारी पहाटेच्या सुमारास एका घराची घोरपडी झाल्याने भीतीचे वातावरण तयार झाले असून अज्ञान चोरट्यांनी घरावर लक्ष ठेवून सुमारे 8400 रुपयांचे सोने व चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम व काही वस्तू 8400 रुपयांच्या असे तब्बल 55 हजार 600 रुपयाची चोरी केली असून प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी घरामध्ये कोणी नसल्याने त्याचा फायदा घेत घरामध्ये प्रवेश केला घटनेची माहिती मिळताच घरमालकाने (कमल विलास रोकडे) यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या घटनेचा तपास व पंचनामा सुरू आहे.

या घटनेचा पूर्ण तपास पौड पोलीस ठाणे तील पोलीस हवलदार सचिन सलगर हे करत आहे. या घटनेमुळे मुळशी तालुक्यात एक चिंताजनक वातावरण निर्माण झाले असून व सुरक्षेतेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे पोलीस तपासातून आरोपींचा लवकरात लवकर पर्दाफाश होईल का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

See also  कोथरूड मध्ये सजग कार्यकर्ते व शिवसेनेच्या ॲम्बुलन्स मुळे वाचले तरुणाचे प्राण