बालेवाडी : 27 व्या कॅप्टन एस.जे. इझेकील महाराष्ट्र राज्य नेमबाजी चॅम्पियनशिप , ट्रॅप आणि डबल नेमबाजी महिला गटात ऐश्वर्या आंदळकर पाटील हिने 2 सुवर्ण पदके जिंकली.
आणि ज्युनियर महिला गटात अनघा काळोखे (वय.14) हचिंग्ज शाळा तळेगाव 7th std.हिला 1 रौप्य पदक मिळाले. तिच्या इच्छाशक्तीच्या जोरावर तिने या स्पर्धेत रौप्य पदक मिळवले आहे. या वयात तिला खूप चांगले यश मिळाले आहे. आणि दोन्ही मुली श्री हेमंत बालवडकर यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहेत.संपूर्ण महाराष्ट्रातून ४० हून अधिक स्पर्धकांनी ही स्पर्धा खेळली आहे.