डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि ज्ञानप्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी (DPGU) तर्फे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे स्वागत; नवीन विभागांचे उद्घाटन संपन्न

पिंपरी : डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे आणि डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, पुणे संचलित ज्ञानप्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी (DPGU) यांच्या संयुक्त विद्यमाने आज कॅम्पसमधील अनेक नवीन विभाग आणि अत्याधुनिक सुविधांचे उद्घाटन महाराष्ट्राच्या माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास ज्ञानप्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटीमधील मान्यवर, प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्राच्या माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार, तर सन्माननीय अतिथी म्हणून सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री माननीय श्री. प्रकाश आबिटकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे माननीय कुलपती डॉ. पी. डी. पाटील होते.

यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या माननीय प्र-कुलपती डॉ. (सौ.) भाग्यश्री पी. पाटील, ज्ञानप्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटीचे माननीय प्र-कुलपती डॉ. सोमनाथ पी. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या माननीय प्र-कुलगुरू डॉ. स्मिता जाधव, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीचे माननीय सचिव डॉ. यशराज पी. पाटील तसेच ज्ञानप्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटीच्या डॉ. रोहिणी एस. पाटील उपस्थित होत्या.

डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमधील नव्याने विकसित सुविधांची पाहणी करण्यात आली. मान्यवरांनी विविध विभागांना भेट देऊन रुग्ण, विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांची माहिती घेतली.त्यानंतर मुख्य सोहळा डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात पार पडला. यावेळी अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी तसेच डीपीयू आणि ज्ञानप्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटीमधील शिक्षक, शिक्षकेतर व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाला लाभलेली मोठी उपस्थिती ही आरोग्यसेवा आणि शैक्षणिक पायाभूत सुविधांमधील या महत्त्वपूर्ण भराबद्दल डीपीयू आणि डीपीजीयू समुदायाच्या सामूहिक उत्साहाचे प्रतीक ठरली.

See also  पैलवान सागर तांगडे यांचे निधन