शहरातील सर्वसामान्य नागरिक काँगेस पक्षासोबत – डॉ.कैलास कदम

पिंपरी : पिंपरी चिंचवड आम आदमी पक्षाच्या पदाधिकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आज शहर काँगेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये महिला अध्यक्ष स्मिता पवार, सहकार आघाडी अध्यक्ष कपिल मोरे यांच्या सोबत इतर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
आज देशात व राज्यात काँग्रेस पक्षाची संघटना मजबुतीने काम करीत आहे. देशाचे विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी ज्या प्रकारे देशातील पीडित वंचित लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजावून घेऊन काम करीत आहेत, त्यावर देशातील सर्वसामान्य नागरीकांमध्ये आश्वासक वतावरण निर्माण झाले आहे. पिंपरी चिंचवड मधील सर्वसामान्यांचा विश्वास काँग्रेस पक्षावर वाढला, असून पक्ष संघटनेत इतर पक्षातील अनेक चांगले पदाधिकारी व कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत, संघर्षाच्या काळात काँग्रेस सोबत उभा राहणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना भविष्यात न्याय नक्कीच मिळेल. येणाऱ्या निवडणुकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करून काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचा संकल्प करूयात.  या प्रसंगी बोलताना शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी माजी महिला काँगेस प्रदेशाध्यक्षा सौ. श्यामला सोनवणे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पर्यावरण विभाग सरचिटणीस अमर नाणेकर, प्रदेश कॉंग्रेस सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्ष वाहब शेख, प्रदेश कॉंग्रेस सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्ष चंद्रकांत लोंढे, वरिष्ठ उपाध्यक्ष मयूर जयस्वाल, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष माऊली मलशेट्टी, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, भोसरी ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, सेवादल अध्यक्ष प्रा. किरण खाजेकर, शहर उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, सोमनाथ शेळके, अर्चना राऊत, सचिन कोंढरे शहर सरचिटणीस जार्ज मॅथ्यू, शहर सचिव आकाश शिंदे, पिंपरी ब्लॉक उपाध्यक्षा ज्योती गायकवाड आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

See also  युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी टाटाच्या मदतीने राज्यभरात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येणार- उपमुख्यमंत्री अजित पवार