पुण्यात २० टक्के पाणीकपातीचे संकट अटळ

पुणे(विशेष प्रतिनिधी) : हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार उन्हाची तीव्रता वाढत जावून पाणी टंचाई जाणवू लागेल. परिणामी नजीकच्या काळात पुणेकरांवर २० टक्के पाणीटंचाईचे संकट अटळ आहे.

दुष्काळाच्या तीव्रतेचा आढावा घेण्यात आला. त्यात आंबेगाव आणि जुन्नर या दोन तालुक्यांनाही दुष्काळी तालुके जाहीर करण्यात आले. आता जिल्ह्याच्या यादीत १० तालुके दुष्काळी म्हणून जाहीर झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे शहरात २० टक्के पाणीकपात जाहीर करण्याची सूचना केली आहे. याबाबतचा निर्णय २८ ऑक्टोबरला महापालिकेच्या मुख्य सभेत होईल.

सध्या पुणे शहरात १० टक्के पाणीकपात लागू केलीच आहे. सप्टेंबर महिन्यात पाऊस सरासरी पेक्षा कमी पडला आणि उन्हाचा तडाखा वाढला , त्यामुळे पाऱ्याचे बाष्पीभवन प्रमाण वाढले. यातून ३ टीएमसी घट पाणी साठ्यात झाली आहे. डिसेंबर महिन्या नंतर वातावरणातील उष्णता अधिकच वाढेल. याकरिता खडकवासला धरण साखळीतील पाणी साठा जपणे आणि जुलै २० अखेर पर्यंत टिकविणे आवश्यक झाले आहे. ही परिस्थिली लक्षात घेतली तर पुण्यातील पाणीकपात वाढवावी लागेल .

See also  बाणेर येथे डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला माजी कृषिमंत्री शिवसेना उपनेते शशिकांत सुतार यांची भेट