विजय रुपलाल श्रीवास्तव यांना दुसऱ्यांदा उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पुरस्कार प्रदान

पुणे : सिद्धार्थ शिक्षण संस्था संचालित, मातोश्री गिरीजाबाई पाटील प्राथमिक शाळा, भैरव नगर, धानोरी, पुणे येथे सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत असलेले श्री. विजय रुपलाल श्रीवास्तव यांना २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिना निमित्ताने २०८ – वडगांवशेरी विधानसभा मतदारसंघात जयंत भोसेकर सर – मतदान नोंदणी अधिकारी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी पर्यवेक्षक श्री. राहुल हाके, श्री. विक्रांत मुळे, अंजली माळी, सोनाली गायकवाड व ममता चौधरी हे उपस्थित होते. श्री. श्रीवास्तव यांना सन २०२२ मध्ये ही जिल्हाधिकारी उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पुरस्कार मिळाला होता. सन २०२४ मध्ये मतदार नोंदणी, वगळणी, दुरूस्ती तसेच त्यासाठी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम या कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सिद्धार्थ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. अशोक पाटील, सचिव अनुराग पाटील आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विद्या पाटील यांनी त्यांना शाबासकी दिली. तसेच संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्री. श्रीवास्तव यांनी माजी पर्यवेक्षिका सौ. स्मिता कुंभार – हिवरेकर व इतर सर्वांचे आभार मानले.

See also  कै. गेनबा म्हस्के मैमोरियल ट्रस्ट शारदीय नवरात्र उत्सवामध्ये कळस म्हस्केवस्ती याठिकाणी एकवीरा देवीचे मंदिर उभारण्यात आले