पिंपरी-चिंचवड : आयर्न मॅन श्री. सचिन वाकडकर यांच्या FitSoul Fitness Club येथे पिंपरी-चिंचवड शहराचे प्रथम नागरिक तथा महापौर मा. श्री. रवी लांडगे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी स्वतः HYROX Workout करून उपस्थितांना फिटनेस, व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटवून दिले.
महापौर रवी लांडगे यांनी स्वतः वर्कआउटमध्ये सहभाग घेत उपस्थितांना नियमित व्यायाम, शारीरिक तंदुरुस्ती आणि आरोग्यदायी जीवनशैली याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या या सहभागामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीर निरोगी आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी फिटनेसला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचा संदेश या भेटीतून देण्यात आला.
या प्रसंगी FitSoul Fitness Club चे संस्थापक व आयर्न मॅन श्री. सचिनभाऊ वाकडकर यांच्यासह क्लबचे भागीदार सागर चक्रे, संजय येवले, अमोल भोंडवे, महेश भोंडवे, विजय पवार, विशाल वाकडकर, अमोल वाकडकर, युवराज वाकडकर, संतोष जगताप, धनंजय पाडाळे, युवराज ताकवणे आणि पै. अभिषेक फुगे आदी उपस्थित होते.
महापौर रवी लांडगे यांच्या या भेटीमुळे FitSoul Fitness Club च्या फिटनेस उपक्रमांना प्रोत्साहन मिळाले. नागरिकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी आणि निरोगी जीवनशैलीचा प्रसार व्हावा, या दृष्टीने ही भेट प्रेरणादायी ठरली.
















