दूध संघर्ष महाअभियानात आम आदमी पार्टीचा सक्रीय सहभाग

पुरंदर : पिसर्वे ता. पुरंदर येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांची दुधाला उत्पादन खर्चावर १५ टक्के नफा गृहीत धरून दर मिळावा. ऊसाच्या धर्तीवर दुधाला एफआरपीचे कायदेशीर कवच देण्यात यावे. दूध दर मूल्य आयोगाची स्थापना करून त्यास वैधानिक दर्जा देण्यात यावा. पशुखाद्य दरावर शासनाचे नियंत्रण असावे आदी मागणी साठी दूध संघर्ष अभियान- आंदोलन राबविण्यात आले होते.
या वेळी आम आदमी पार्टी च्या वतीने पाठिंबा देण्यासाठी राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, सरकारने 34 रुपये प्रति लिटरचा दूध खरेदी दर जाहीर केला परंतु दूध संघ आणि कंपन्या यांनी हात मिळवणी करून आज दूध दर पाडण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला दिसतोय या दूध प्रक्रिया उद्योगांच्या मनमानी कारभाराला वेसण घालण्याची गरज आहे. दुधावर मोठे झालेले बोके सरकार मध्ये असून त्यांनीच शेतकऱ्याचा जोडधंदा तोट्यात आणला आहे. शेतकरी प्रश्नांवर ते संवेदनशील नाहीत.

या वेळी मार्गदर्शन करताना शेती अभ्यासक सतीश देशमुख यांनी दुधाचे अर्थकारण समजून सांगताना येणाऱ्या काळात कायदेशीर लढा देणार असल्याचे सांगितले.
तसेच आप पुरंदर अध्यक्ष दत्तात्रय कड यांनी शेतकऱ्याच्या आजच्या दयनीय आर्थिक परिस्थितीला सरकारची शेतकरी हिताच्या विरोधातील धोरण व प्रस्थापित पक्ष आणि नेते जबाबदार असल्याचे सांगत अधिवेशनात सरकारने न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली.

सागर जाधव यांनी तात्काळ उपाय योजना म्हणून ३.२फॅट ८.३ snf दुधाला ३४ रुपये दर मिळावा अशी मागणी केली.अभियानास पंचक्रोशीतील उपस्थित शेतकऱ्यांनी समस्या मांडून सरकारी धोरणांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

See also  योगीराज पतसंस्थेचे मदत करणारे हात हे खूप मोठे आहेत : मेधा कुलकर्णी