बालेवाडीत ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुणांसाठी मैदानाची मागणी

बालेवाडी : बालेवाडी परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुणांना सकाळी व संध्याकाळी फिरण्यासाठी तसेच व्यायामासाठी मैदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी पुणे महानगरपालिकेकडे केली आहे. यासंदर्भात औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गोविंद दांगट यांना निवेदन देण्यात आले.

बालेवाडी परिसरात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फिरण्यासाठी आणि व्यायामासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने नागरिकांनी ही मागणी केली आहे. यावेळी शिरीष बापट, सुदर्शन जगदाळे, अरुणकुमार राणे, सुभाष येवरे, रमेश जांभुळकर, विनायक बयाणी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

निवेदनानंतर झालेल्या चर्चेदरम्यान सहाय्यक आयुक्त गोविंद दांगट यांनी गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० वाजता मोझे कॉलेजजवळ महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसह उपस्थित राहण्याचे मान्य केले.

या वेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या भागातील महापालिकेशी संबंधित समस्या, अडचणी आणि आवश्यक सुविधांबाबत माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

See also  शासकीय जमिनींच्या वर्गीकरणातील नियमांमध्ये सुस्पष्टतेसाठी  विशिष्ट कार्यप्रणाली आणणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे