शेती, बेरोजगारी, उत्पादन क्षेत्र,महागाई, सामाजिक न्याय आणि संधीचा अभाव अश्या मुलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करणारा अर्थसंकल्प -आप मुकुंद किर्दत

पुणे : जिल्हा पातळीवर उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी वसतिगृह ही चांगली बाब. ऍनिमेशन, गेमिंग साठी १५००० कंटेंट प्रयोगशाळा ही कल्पना ठराविक क्षेत्रावर अतिरेकी भर तसेच हॉस्पिटबिलिटी म्हणजे आदरतिथ्य,हॉटेल अश्या क्षेत्राचा विकास बाजाराच्या चढउतारा प्रमाणे होतो त्यावर अतिरिक्त भर देण्याची गरज नसते. वैज्ञानिक दृष्टीकोण विकसित करण्याच्या उद्देश्याने ५०००० अटल टिंकरिंग लॅब ची मागील वर्षीची तसेच ब्रॉडबँड पुरवण्याची घोषणा अशीच हवेत विरली आहे.

औद्योगिक परिसरात संलग्न पाच विद्यापीठ क्षेत्र ही बाब आकर्षक वाटते परंतु सरकार ही उच्च शिक्षण जबाबदारी टाळून खाजगी क्षेत्राकडे देत असल्याने याचे सामान्य माणसाला दीर्घकालीन नुकसानाचे होईल ही भीती आहे. नवीन शिक्षण धोरणानुसार जीडीपीच्या सहा टक्के पर्यंत शिक्षण क्षेत्रावर खर्च वाढवत नेणे अपेक्षित असताना त्याबाबतीत निराशा.

अतीतातडीचे उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात ५० टक्के क्षमता वाढ ही चांगली बाब. अतिवेगवान/ बुलेट रेल्वे वाहतूक यापेक्षा सुरक्षित, उपलब्ध आणि कोंडीमुक्त सार्वजनिक वाहतूक ही महत्वाची मागणी आहे म्हणजे सामान्य प्रवासी रेल्वे गाड्या वाढवणे गरजेचे. औद्योगिक उत्पादन क्षेत्रात फारशी वाढ नाही. अनेक Midc जागा ओसाड आहेत. त्यामुळे २००० औद्योगिक क्लस्टर ची अंमलबजावणी खात्रीची नाही. पुरातत्व स्थळ विकास, पर्यटन गाईड ट्रेनिंग ही चांगली बाबऔषध क्षेत्रात संशोधन संस्था ही चांगली बाब.

या बजेट मध्येही सेवा क्षेत्रावर अधिक भर दिसतो त्या मनाने उत्पादन, निर्मिती क्षेत्रावर आपला वाटा जगभरात घसरतो आहे ही गंभीर बाब आहे त्यावर भर देणे आवश्यक होते.
एकुणात नुकसान देणारी शेती , बेरोजगारी , संकुचित होत असलेले उत्पादन क्षेत्र ,महागाई, सामाजिक न्याय आणि संधीचा अभाव अश्या मुलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करणारा अर्थसंकल्प

See also  प्रभाग क्रमांक ९ मधून भाजपाच्या रोहिणी चिमटे यांचा विक्रमी विजय४१,९८० मतांसह पुणे शहरातील सर्वाधिक मते घेणाऱ्या नगरसेविका ठरल्या