मोदी आवास घरकूल योजनेअंतर्गत ८६५ पात्र लाभार्थीना घरकुल मंजूर

पुणे : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थीकरिता राबविण्यात येणाऱ्या मोदी घरकूल योजनेअंतर्गत ८६५ पात्र लाभार्थीना घरकुल मंजूर करण्यात आले.

मोदी आवास घरकूल योजना ग्रामीण २०२३-२४ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील ८६५ पात्र बेघर लाभार्थीना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्याहस्ते घरकुलासाठी ऑनलाईन मंजुरी देण्यात आली. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू तसेच सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी उपस्थित होते.

या लाभार्थीना तालुकास्तरावरून थेट लाभार्थीच्या खात्यात टप्पानिहाय घरकुलाचे अनुदान जमा केले जाईल. या सर्व लाभार्थीचे घरकुलाचे बांधकाम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश श्री.चव्हाण यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले. संबंधित सर्व लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम त्वरीत सुरु करुन किमान कालावधीत पूर्ण करण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले.

इच्छुक पात्र नागरिकांनी अधिक माहितीसाठी पंचायत समितीशी संपर्क साधावा आणि ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीत अर्ज सादर करावा, असे आवाहन श्रीमती कडू यांनी केले आहे.

See also  गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीच्या बदलाबाबत तात्पुरते आदेश जारी