केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूड उत्तर मंडलाच्या वतीने रक्तदान शिबिर तसेच दुष्काळग्रस्तांसाठी अन्नधान्य संकलन

पाषाण : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने राबविण्यात येणाऱ्या रक्तदान महासंकल्प अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी कोथरूड उत्तर मंडलाच्या वतीने पाषाण येथे रक्तदान शिबिराचे तसेच दुष्काळग्रस्त बांधवांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य संकलन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला भेट देत मुरलीधर मोहोळ यांनी रक्तदाते आणि आयोजकांशी संवाद साधला. यावेळी आमदार विक्रांत पाटील यांचीही उपस्थिती होते.

कार्यक्रमाला कोथरूड उत्तर मंडळाचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, ज्येष्ठ नेते प्रकाशतात्या बालवडकर, नगरसेविका मयुरी कोकाटे, नगरसेविका रोहिणी चिमटे, नगरसेविका निवेदिता एकबोटे, लहू बालवडकर, राहुल कोकाटे, गणेश कळमकर, प्रमोद निम्हण, अनुप मोरे, नवनाथ पारखे, मोरेश्वर बालवडकर, अस्मिता करंदीकर, सचिन दळवी, वंदना सिंग, रोहन कोकाटे, शिवम बालवडकर, वैदेही बापट महेश सुतार, सचिन सुतार, मनोज दळवी, रघुनाथ उत्पात, स्नेहल सुतार, जागृती विचारे, रीना रायकर मृणाल गायकवाड, स्मृती जैन, प्राजक्ता देवस्थळी, श्रेयस जाधवर, कृष्णा शर्मा, कौशल टंगसळी, धनंजय भुजबळ, पार्थ रणपिसे, बालाजी रत्ने, प्रिया अजमेरिया, संजीवनी आवटी, पल्लवी पाटील, श्रद्धा जोशी, सोनाली कुलकर्णी, सरिता चोरमुले, तृप्ती जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी संकलित करण्यात आलेले अन्नधान्य खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते देण्यात आले.

See also  स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांवर महाराष्ट्राची मोहोरसासवड देशात प्रथम; लोणावळा तिसऱ्या स्थानी