कॉंग्रेसची पक्ष संघटना मजबुती ची तयारी

पुणे ,(राजेंद्र पंढरपुर): लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पक्षसंघटनेत लक्ष घातले असून त्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते पद मिळाल्यावर राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारला संसदेत आणि संसदेबाहेरही धारेवर धरले आहे. ‘व्होट चोरी’ करून मोदी सरकार सत्तेवर आले आहे. महाराष्ट्र, हरियाणा आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांत जनतेचा कौल डावलून ‘व्होट चोरी ‘ करून त्यांनी सरकार स्थापन केले आहे. त्या विरोधात राहुल गांधी यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे. स्पर्धा परीक्षांमधील घोटाळे, चीनची अरूणाचलमधील घुसखोरी, मोदी सरकारने अमेरिकेबरोबर केलेले करार, सरकारची शेतकरी विरोधी धोरणे आदी मुद्दे घेऊन राहुल गांधी सरकारशी संघर्ष करीत आहेत.हे आंदोलन चालू असतानाच कॉंग्रेसची पक्षसंघटना मजबूत असणे गरजेचे आहे. याकडे पक्ष नेत्यांनी राहुल गांधींचे लक्ष वेधले. पक्ष नेत्यांची सूचना लक्षात घेऊन राहुल गांधी यांनी दिवाळी मिलन असा कार्यक्रम आयोजित केला. पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख नेते, पक्षाचे प्रत्येक राज्यातील अध्यक्ष यांना फराळासाठी निमंत्रित करण्यात आले होते. फराळानिमित्त जमलेल्या नेत्यांशी राहुल गांधी यांनी चर्चा केली. राष्ट्रीय पातळीपासून गाव पातळीपर्यंत पक्ष संघटना मजबूत व्हावी यावर कार्यक्रमात सखोल चर्चा झाली. २९ सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षसंघटना भक्कम पायावर उभी करण्याच्या हेतूने आगामी काळात प्राधान्य दिले जाईल, असे मत बैठकीत उपस्थित राहिलेल्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

हे आंदोलन चालू असतानाच कॉंग्रेसची पक्षसंघटना मजबूत असणे गरजेचे आहे. याकडे पक्ष नेत्यांनी राहुल गांधींचे लक्ष वेधले. पक्ष नेत्यांची सूचना लक्षात घेऊन राहुल गांधी यांनी दिवाळी मिलन असा कार्यक्रम आयोजित केला. पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख नेते, पक्षाचे प्रत्येक राज्यातील अध्यक्ष यांना फराळासाठी निमंत्रित करण्यात आले होते. फराळानिमित्त जमलेल्या नेत्यांशी राहुल गांधी यांनी चर्चा केली. राष्ट्रीय पातळीपासून गाव पातळीपर्यंत पक्ष संघटना मजबूत व्हावी यावर कार्यक्रमात सखोल चर्चा झाली. २९ सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षसंघटना भक्कम पायावर उभी करण्याच्या हेतूने आगामी काळात प्राधान्य दिले जाईल, असे मत बैठकीत उपस्थित राहिलेल्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

See also  प्रा. रमेश गोपाळे यांना पुणे विद्यापीठाची पीएच.डी (विद्यावाचस्पती)पदवी प्रदान