वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्त भागातील गोवंश संवर्धनाचा संकल्प

बालेवाडी : बालेवाडी येथील श्री. राहुलदादा बालवडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बालवडकर परिवार आणि राहुलदादा बालवडकर मित्र समूहाच्या वतीने यंदा वाढदिवस अत्यंत साधेपणाने आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला.

वाढदिवसाच्या कार्यक्रमावरील अनावश्यक खर्चाला फाटा देत बालेवाडी ज्येष्ठ नागरिक संघ आणि चैतन्य गायन कट्टा यांच्या सहकार्याने हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दुष्काळग्रस्त भागातील गोवंश संवर्धनासाठी विशेष संकल्प करण्यात आला. याअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाथरूड परिसरातील गोधनासाठी ओला व सुका चारा पाठविण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिली.

वाढदिवस केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू घटकांसाठी आणि मुक्या जनावरांच्या संवर्धनासाठी उपयोगी ठरावा, या भावनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला.

या प्रसंगी  ज्ञानेश्वर तापकीर, अशोकराव मुरकुटे, रतन बालवडकर, अमित कुदळे, सारंग वाबळे, अमेय जगताप, विशाल गांधीले, आबा घुले, जीवन चाकणकर, अनिकेत मुरकुटे, राजेश विधाते, गणपत मुरकुटे, सेवानिवृत्त एसीपी अजय कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, डॉ. राजेश देशपांडे, वैशाली कामजदार, बालेवाडी वेल्फेअर असोसिएशनचे सदस्य, स्थानिक नागरिक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवण; शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहात