विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवण; शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहात

पुणे, धानोरी : सिद्धार्थ शिक्षण संस्था संचालित मातोश्री गिरीजाबाई पाटील प्राथमिक मराठी शाळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय, भैरव नगर, धानोरी, पुणे येथे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव व निर्णयक्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने आज शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आली.

शालेय मंत्रिमंडळाच्या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विविध पदांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज भरून प्रचार केला. विद्यार्थ्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमोर विचार व भूमिका मांडत मतदानाचे आवाहन केले. त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया शिस्तबद्ध व लोकशाही पद्धतीने पार पडली. विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावत लोकशाही व्यवस्थेतील निवडणूक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मतदान, उमेदवारी, प्रचार, निवडणूक प्रक्रिया, नेतृत्व, शिस्त, जबाबदारी आणि लोकशाही मूल्ये यांची प्रत्यक्ष माहिती मिळाली. शालेय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित होण्याबरोबरच शाळेतील विविध उपक्रमांमध्ये जबाबदारीने सहभागी होण्याची प्रेरणा मिळणार आहे.

शालेय मंत्रिमंडळाच्या निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. “शालेय निवडणूक ही योग्य उमेदवार कसा निवडावा, याचे ज्वलंत उदाहरण होय” असे प्रतिपादन मुख्याध्यापिका सौ.विद्या पाटील यांनी केले.

“आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. शालेय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव देतानाच नेतृत्व, शिस्त व जबाबदारीचे संस्कार घडविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे,” असे मत मुख्याध्यापक श्री. विजय श्रीवास्तव यांनी व्यक्त केले.

संकल्पना व मार्गदर्शन – सौ. विद्या पाटील व श्री. विजय श्रीवास्तव
निवडणुकीची घोषणा व नियोजन – श्री. विजय श्रीवास्तव व सौ. तृप्ती कांबळे उमेदवारी अर्ज भरणे व जमा करणे – सौ. सविता इमडे व कु. रिया वाघ उमेदवारांची माहिती व प्रचार – सौ. शारदा पाटोळे मतदान प्रक्रिया – सौ. अर्चना बनछोड व सौ. सुखदा वाळंज
मतमोजणी व निकाल जाहीर करणे – श्री. योगेश बिंदगे व सौ. मानसी पलांडे या सर्वांनी दिलेली भूमिका पर पाडली.

See also  प्रदेश प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश ॲड डॉक्टर मधुकर मुसळे यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघामध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत विजयी उम्मीदवार दिपक चव्हाण, तेजश्री मॅकल, संचिका थुल, श्रुती भोसले, वीरा जोशी, साक्षी मस्के, हर्षदा कंगणकोटे, सृष्टी मुजमुले, माही राजपूत या सर्वांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी श्री. मारुती पाटील, सौ. मनीषा चिंचणे, श्री. अंबादास कांबळे, सौ. रूपाली पवार, सौ. प्रिया शेलार, सौ. ममता चौधरी, सौ. सुप्रिया भारती, सौ. रमाताई डंबारे, श्री. गौतम बोरकडे आणि श्री. मुकेश विधाते यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.