‘कचरा मुक्त कसबा’ घोषणा हवेतच!भिडे पूल कॉर्नरवर कचऱ्याचा ढीग

पुणे : कसबा पेठेत कचरा मुक्तीची घोषणा फक्त कागदावरच राहिली आहे. भिडे पूल कॉर्नर, केळकर रोड येथे गेल्या काही दिवसांपासून कचरा साठून राहिला असून, नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे.

या साठलेल्या कचऱ्यात एक गोमाता भूक लागल्याने खाद्य शोधताना दिसली. कचऱ्यात अन्न शोधणाऱ्या गायीला पाहून नागरिकांना कीव आली. “स्वच्छतेचा दावा करणाऱ्या शहरात गोमातेला कचऱ्यात अन्न शोधावं लागतं, ही शोकांतिका आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.

केळकर रोड हा वर्दळीचा रस्ता आहे. शाळा, दुकाने आणि मंदिर परिसरात दररोज हजारो नागरिकांची ये-जा असते. कचऱ्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, रोगराई पसरण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

महापालिकेने तातडीने कचरा उचलून परिसर स्वच्छ करावा आणि नियमित कचरा उचलण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे

See also  नारायण सदाशिव पेठ,  लक्ष्मी रस्त्यावरील श्री गजानन मंडळ आणि श्री गरुड गणपती ट्रस्ट ची एकत्रित विसर्जन मिरवणूकीची यंदा दशकपूर्ती