पुणे : पुणे महापालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये कायम नोकरीच्या आमिषाने ११ कंत्राटी डॉक्टरांकडून ८ ते १३ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.
प्राध्यापकपदासाठी १३ लाख, सहयोगी प्राध्यापकासाठी १० लाख तर सहाय्यक प्राध्यापकासाठी ८ लाख रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पैसे देऊनही नोकरी न मिळाल्याने ३ डॉक्टरांनी महापौर, आयुक्त आणि लाच लुचपत खात्याकडे तक्रार केली आहे. आयुक्तांनी पोलीस तक्रार दाखल करून चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
















