विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट व अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने मोफत बालेवाडी ते पंढरपूर यात्रा

बालेवाडी : आषाढी एकादशीनिमित्त बालेवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजय बालवडकर व अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने मोफत पंढरपूर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. बालेवाडीतून जाणाऱ्या या पंढरपूर यात्रेचे हे २९ वे वर्ष आहे.

विठुरायांचे दर्शन घेण्यासाठी या यात्रेत ६५० भाविक सहभागी झाले. माऊलीचे नामस्मरण करून मोठ्या भक्तिभावाने व पवित्र वातावरणात सदर यात्रा १२ बसेसच्या माध्यमातुन पंढरपूर नगरिकडे रवाना झाली. विठ्ठल-रखुमाईच्या गजरात संपूर्ण परिसर यावेळी दुमदुमला.

याप्रसंगी संजय बा.बालवडकर (अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट बालेवाडी), सौ. आशाताई बालवडकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, प्रकाश बालवडकर, अनिल बालवडकर, आत्माराम बालवडकर, शशिकांत बालवडकर, सुभाष भोळ, बालेवाडी भजनी मंडळ व बालेवाडी-बाणेर-सुस-म्हाळुंगे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

See also  शिवाजीनगर येथे नवरात्री निमित्त ‘भक्तिरंग शारदीय भजन स्पर्धा’ उत्साहात संपन्न ; सनी निम्हण यांच्या अभिनव उपक्रमामुळे महिला वर्गाच्या चेहऱ्यावर फुलले हास्य