भव्य स्क्रीनच्या माध्यमातून मनोज जरंगे पाटील यांच्या जालना येथील भाषणाचे बाणेर येथे प्रक्षेपण

बाणेर : बाणेर बालेवाडी पाषाण सुतारवाडी सोमेश्वरवाडी औंध सकल मराठा समाजाच्या वतीने अंतरवली सराटी येथील मनोज जरंगे पाटील यांच्या सभेचे लाईव्ह प्रक्षेपण भव्य स्क्रीन लावून बाणेर येथे करण्यात आले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मनोज जरंगे पाटील यांचे अंतरवली सराटी येथील भाषण यावेळी स्क्रीनवर दाखवण्यात आले.

मराठा आरक्षणासाठी परिसरातील मराठा बांधव एकत्र करुन सकल मराठा समाजाच्या माध्यमातून मराठा समाज सहाय्यक समिती स्थापन करण्याबाबत माहिती देण्यात आली. तसेच या समितीचे सदस्य होण्याचे आवाहन करण्यात आले.

See also  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक आढावा बैठक संपन्न