कात्रज येथील डीपीमधील मैदानाचे आरक्षण उठवू नये यासाठी महाविकास आघाडीचे आंदोलन

पुणे : कात्रज येथील डीपीमधील मैदानाचे आरक्षण उठवू नये ,ती जागा मुलांना खेळासाठी राहू द्यावी या मागणीसाठी महाविकास आघाडीचे वतीने पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले.


पुणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात मैदानासाठी दर्शविण्यात ३.५९१ हेक्टरचा भूखंड पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला (कात्रज डेअरी) देण्याचा निर्णय झाला आहे.ही जागा मुलांना खेळासाठी राहू द्यावी अशी मागणी आज महाविकास आघाडीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या समोर आंदोलन करण्यात आले.कात्रज येथील क्रीडांगणाचे आरक्षण उठवून दूध डेअरी व प्रक्रियेसाठी आरक्षण टाकणार असल्याच्या निषेधार्थ पुण्याचे पालकमंत्री व पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पुणे महानगरपालिका समोर आंदोलन घेण्यात आले.

यावेळी वेगवेगळे खेळ रस्त्यावर खेळण्यात आले बरेच खेळाडू उपस्थित होते.त्यानंतर. कात्रज येथील डीपीमधील मैदानाचे आरक्षण उठवू नये याबाबत पुणे महानगरपालिका आयुक्त मा. विक्रमकुमार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की दूध डेअरी व प्रक्रिया उद्योग ग्रामीण भागाशी संबंधित आहे.महापालिकेच्या डीपीमधे याबाबत आरक्षण नाही . शहरांमध्ये खेळासाठी मैदानिची कमतरता भासत असताना ही जागा कात्रज डेअरीच्या व्यावसायिक वापरासाठी काढून घेणे योग्य नाही.पुणे शहरांमध्ये मुलांना खेळांसाठी पुरेसे क्रीडांगण नाही असे असताना जी जागा क्रीडांगणासाठी आरक्षित आहे आणि जर त्या जागेवरच आरक्षण काढून कात्रज डेअरीला ती जागा पुणे महानगरपालिका देणार असेल तर ते पुणेकरांच्या हिताचे नाही तसेच कात्रज, धनकवडी या भागात दाट लोकवस्ती आहे येथे मुलांना खेळांसाठी हक्काचे मैदान आवश्यक आहे त्यामुळे महाविकास आघाडी पुणेकरांच्या हितासाठी आज रस्त्यावर उतरून आपला विरोध दर्शवित आहे.यावेळी पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना गटाचे (उद्धव ठाकरे गट) गजानन थरकुडे संजयजी मोरे, माजी आमदार दिप्ती चवधरी, ऍड.अभय छाजेड, संगिता तिवारी, लता राजगुरू, गोपाळ तिवारी,शिवा मंत्री, अजित दरेकर रजनी त्रिभुवन, ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव, अक्षय माने,राजू याने संतोष पाटोळे, कृष्णा सोनकांबळे,एंन.एस.यू.आय.अध्क्ष अभिजित गोरे, प्रियांका रणपिसे,द.स.पोळेकर, सचिन आडेकर, सतिश पवार यशराज पारखी, बाळासाहेब मारणे लतेंद्र भिंगारे , मुन्नाभाई शेख , यासिन‌ शेख, अभिजित महामुनी, आशुतोष शिंदे आकाश माने,ओम भंवर उषा राजगुरू,रेखा गेहलोत, नलीनी दोरगे,छाया जाधव, सुंदर ओव्हाळ ,मोती उडते, सीमा महाडिक , शारदा वीर, अश्विनी गवारे, ज्योती परदेशी, दिलीप लोळगे,सेल्वराज अंथोनी,सागर खडके,नागेश कवडे दत्ता जधव आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  नागरिकांच्या आयुष्यात अनुकूल बदल घडवून आणणे हे शासनाचे उद्दिष्ट-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे