पुणे : आपला इतिहास मांडताना तारतम्य बाळगण्या बरोबरच इतर धर्मांचा तौलनीक अभ्यास हवा असे मत स्वामी रामानंद विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले.
ते गुरुकुप्रतिषठण ने आयोजित केलेल्या विंग कमांडर विजय चतुर (निवृत्त) आणि डॉ शुभदा वर्तक यांनी अनुवादित केलेल्या”चंडी दि वार ” तथा चंडी गाथा या पुस्तक प्रकाशन प्रसंगी बोलत होतै. अध्यक्ष स्थानी गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ अशोक कामत होते.
या वेळी विंग कमांडर विजय चतुर यांना “चोखामेळा “पुरस्काराने गौरविण्यात आले. माणूस पणाची ओळख विसरुन जात समाज व विचारला जातोय अशी खंत ही कुलगुरू विद्यासागर यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी बोलतांना माजी खासदार व भारतीय इतिहास स़शोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांनी इंग्रजांनी जाणिवपूर्वक भारताची सांस्कृतिक नाळ तोडलयानेच देशाचा नकाशा बदलला असल्याचे प्रतिपादन केले.
प्रारंभी डॉ .अशोक कामत यांनी गुरुकुल करत असल्या कामाचा आढावा मांडला. शिख-हिंदू धर्मीयांचा बंधूभाव सांगताना इतिहाचे दाखले देत ही एकता वाढीस लागण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.या पुस्तकाचे अनुवादक विजय चतुर यांनी या पुस्तकाचे महत्त्व विषद करताना च़डीका चे स्वरुप कार्य आणि युद्धाचे अनेक दोहे सादर केले.
तसेच डॉ शुभदा वर्तक यांनी या पुस्तकाचे काम करतांना आगळी प्रेरणा मिळते असे मनोगत व्यक्त केले.यावेळी डॉ वर्तक यांनी प्रास्ताविक केले.आरती मोने यांनी उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमाला आवर्जून शिख आणि हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.