पुणे : ह्यूमन राइट्स प्रखर शोध मोहीम संस्था जागतिक मानव अधिकार दिनाच्या निमित्ताने विशेष कार्य करणाऱ्या मान्यवरांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यामध्ये विठ्ठलराव वरुडे पाटील यांना समाजसेवेचा मानवाधिकार पुरस्कार देऊन सन्मानित केले.
ह्यूमन राइट्स प्रखर शोध मोहीम संस्था मागील वीस वर्षापासून अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त उत्साह पूर्ण वातावरणात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत असते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ब्रिगेडियर डॉ. एस.के अंबिके (नि) व्ही एस एम, भानुप्रताप बर्गे (से.नि.स.पोलीस आयुक्त पुणे), मा.श्री अजय पाल सिंग सेवा निवृत्त लेफ्टन जनरल भारत सरकार, मा.शैलेश सूर्यवंशी उपजिल्हाधिकारी से.नि.लेफ्टन कमांडर भारत सरकार मा.डॉ.मानसिंग साबळे ससून हॉस्पिटल.मा.श्री.सुभाष जगताप माजी सभागृह नेता व मा.नगरसेवक मा.श्री.दिनेशभाऊ उर्फ पिंटूभाऊ धाडवे माजी नगरसेवक मा.सायलीताई वांजळे माजी नगरसेविका मा.श्री.शरदभाऊ मोहोळ समाजसेवक डॉ.संदीप दळवी, अशोक जगताप, नितीन काळे, मनोज अडागळे युथ ग्रीन क्लबचे अध्यक्ष अथर्व गवळी यांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.
माय माऊली केअर सेंटर यासह विविध सामाजिक संस्थाच्या माध्यमातून वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांची अहोरात्र सेवेचा सन्मान व सामाजाभिमुख कार्याचा गौरव म्हणून विठ्ठलराव वरूडे पाटील यांना शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, व मानपत्र देऊन गौरव करण्यात आले.
आपल्या कार्याने समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करून गरजूंचा आधारवढ बनणाऱ्या मान्यवरांना कार्यक्रमाचे आयोजक ह्यूमन राइट्स प्रखर शोध मोहीम संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.अभिमन्यू गवळी व राष्ट्रीय महासचिव डी. एस गवळी व सर्व हुमान राइट्स प्रखर शोध मोहीम संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आदी मान्यवर यांच्या वतीने सन्मानित केले.
सत्काराला उत्तर देताना वरुडे पाटील यांनी सांगितले की, अशा पुरस्कारामुळेच सामाजिक क्षेत्रात सेवा करण्यासाठी गती आणि प्रेरणा मिळत असते. यामुळे सामाजिक जबाबदारी व उत्साह देखील वाढला आहे. यापुढे सामाजिक क्षेत्रात जास्तीत जास्त व सचोटीने काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. हा पुरस्कार ज्या ज्येष्ठ व वृद्धाच्या सेवेमुळे मिळाला त्यांना समर्पित करत असून पुरस्कार दिल्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद देत आभार मानतो.