समाजभूषण शांताराम महाराज निम्हण यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनानिमित्त “सुभावभजन” गौरव ग्रंथाचे प्रकाशन

पाषाण : समाजभूषण ह. भ. प. शांताराम महाराज निम्हण यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनानिमित्त ‘सुभावभजन’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन पाषाण करण्यात आले. तसेच पाषाण सुतारवाडी सोमेश्वरवाडी ग्रामस्थांच्या वतीने शांताराम महाराज निम्हण यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी खासदार नानासाहेब नवले, समाजभूषण शांताराम महाराज निम्हण, सौ. पार्वती शांताराम निम्हण, संत नामदेव महाराज यांचे वंशज ह.भ.प. केशव महाराज नामदास, सासवड येथील संत सोपानदेव समाधी संस्थानचे विश्वस्त ह. भ. प. गोपाळ महाराज गोविंद गोसावी, ह. भ. प. बंडातात्या कराडकर, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह. भ. प. बाळासाहेब महाराज देहूकर, संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक उल्हासदादा पवार, महंत ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप, ह. भ. प. चंद्रकांत महाराज वांजळे, ह. भ. प. शेखर महाराज जांभूळकर, मृदंगमणी पांडुरंग आप्पा दातार यांच्यासह हजारो वारकरी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शांताराम महाराज निम्हण यांना मानपत्र,शाल ,श्रीफळ,पुष्प देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. वारकरी संप्रदायातील मुलांना मदत करण्यासाठी ” समाजभूषण शांताराम सयाजीबुवा निम्हण ट्रस्ट” ची सुरुवात यावेळी करण्यात आली.

प्रमोद महाराज जगताप म्हणाले, अण्णांना अहंकार कधीच शिवला नाही. अण्णा हे विभूतीमत्त्व आहे.भजनामध्ये अखंड 50 वर्ष कोणतेही मानधन अथवा नारळही न स्वीकारता शांताराम महाराज यांनी गायनसेवा केली आहे.

माजी आमदार उल्हास पवार म्हणाले, सध्या अनेक जण विचार मांडतात पण विचाराप्रमाणे कृती करणारे दिसत नाहीत. शांताराम महाराज यांच्या सारखी विचार प्रमाणे कृती करणारी माणसे समाजाला प्रेरणा देतात.

यावेळी शांताराम महाराज निम्हण यांनी आपल्या गायनातून सत्काराला उत्तर देत आभार व्यक्त केले.
चपराक प्रकाशनाच्या वतीने “सुभावभजन” हा गौरव ग्रंथ यावेळी प्रकाशित करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक तानाजी निम्हण यांनी प्रास्ताविक केले. तर भगवान निम्हण यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत वांजळे व शेखर जांभुळकर यांनी केले. यावेळी पाषाण सुतारवाडी सोमेश्वरवाडी ग्रामस्थ व भजनी मंडळ तसेच राज्यभरातून आलेले वारकरी उपस्थित होते.

See also  सुस मधील पेरिविंकल मध्ये थेट अयोध्येतील श्रीरामांच्या अमृत कलशा चे आगमन