ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ साठीचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार तर ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते आज राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान #महाराष्ट्रभूषण पुरस्कार तसेच सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे विविध चित्रपट, सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करण्यात आले.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ साठीचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार तर ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.

‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’, ‘स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार’ आणि ‘स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार’, ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ आणि ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार’ यावेळी प्रदान करण्यात आले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

See also  राहुल बालवडकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)पक्षाच्या शहर उपाध्यक्ष पदी निवड