कोथरूड मध्ये मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी आंदोलन

कोथरूड : सकल मराठा समाज पुणे शहराच्या वतीने मराठा आरक्षणासाठी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील काम करत असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी तसेच त्यांच्यावर अन्यायकारक पद्धतीने लावलेल्या एस.आई.टी (SIT)चौकशीच्या निषेधार्थ व  सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी. या मागणीसाठी   छत्रपती शिवाजीमहाराज पुतळा कोथरूड या ठिकाणी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले .

यावेळी कोथरूड, कर्वेनगर, वारजे, बावधन, पाषाण सुतारवाडी तसेच शहरातील विविध भागातील मराठा बांधव सहभागी झाले होते. या आंदोलनात महिलांचा देखील लक्षणिय सहभाग होता.

यावेळी अन्यायकारक पद्धतीने लावलेल्या एस.आई.टी (SIT)चौकशीच्या निषेध करण्यात आला. व  सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी अशी मागणी करण्यात आली.

See also  मणिपूर मध्ये झालेली घटनांच्या निषेधार्थ बीएसएनएल ऑफिस मध्ये बी.एस.एन. एल. एम्प्लाईज युनियन, आणि बी.एस.एन.एल. वर्कींग वुमैन को-आर्डीनैशन कमिटी आणि आल इंडिया बी.एस.एन.एल.DOT पेन्शनर्सर असोसिएशन निदर्शने.