महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची आमदार अमित गोरखे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट

पिंपरी चिंचवड ; महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांनी पुणे दौऱ्यावर आले असता त्यांनी  आमदार श्री. अमित गोरखे यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.

या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये दिलखुलास चर्चा झाली. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजांवर आणि शासनाच्या पातळीवर सुरू करता येणाऱ्या उपाययोजनांवर यावेळी विशेष चर्चा झाली. शहरातील प्राथमिक व विशेष आरोग्यसेवा अधिक प्रभावी आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध योजनाचे मार्गदर्शन मंत्री मोहदयानी केले.

तसेच, लवकरच माझ्या जनसंपर्क कार्यालयामार्फत पिंपरी चिंचवड शहरवासीयांसाठी वैद्यकीय कक्ष सुरू करणार असल्याची माहिती आमदार अमित गोरखे यांनी मंत्री प्रकाश आबिटकर यांना दिली. या संदर्भातील सर्व मदत मी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रशासनामार्फत करेल असे मंत्री प्रकाश अबिटकर यांनी आश्वस्त केले.ही सदिच्छा भेट परस्पर सहकार्य, विकासदृष्टी आणि जनहिताच्या कार्यासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरली. या उपक्रमामुळे गरजूंना वैद्यकीय सहाय्यासाठी अधिक सुलभपणे मदत मिळू शकेल, असा विश्वास आमदार अमित गोरखे यांच्याकडून व्यक्त करण्यात आला.

या भेटीप्रसंगी अनेक मान्यवर डॉक्टर आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामध्ये: डॉ. प्रताप सोमवंशी, अध्यक्ष NIMA पिंपरी चिंचवड, तसेच अध्यक्ष भाजपा डॉक्टर्स सेल, पिंपरी चिंचवड Dr. रमेश केदार, Dr. सत्यजीत पाटील, डॉ . वैभव लाडे, डॉ . प्रशांत बंब, डॉ . साहेबराव सांगवीकर, डॉ . पिंजारी सर
यांच्या उपस्थितीत होते. यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर यांना साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचं शिल्प ,शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

See also  भुगाव येथील द-वन, स्प्लेंडर ग्रीन सोसायटीचा वाहून गेलेला रस्ता दुरुस्त करण्याची मागणी