शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात मतदान जनजागृती

पुणे, दि. २३: आगामी लोकसभा सार्वजनिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी २०९ शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात स्वीप पथकाने भारत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहकार्याने विद्यालयात ३७० विद्यार्थ्यांसह जनजागृती रॅली व चित्रकला स्पर्धा घेत मतदान जनजागृती केली.

कार्यक्रमास स्वीप समन्वयक राजेंद्र मोरे, पांडुरंग महाडिक, दीपक कदम, प्राचार्य सागर काशिद, उपप्राचार्य उज्वला पिंगळे, पर्यवेक्षक मनीषा हवलदार आदी उपस्थित होते.

स्वीपपथकाद्वारे शाळेच्या सहकार्याने मतदान जनजागृती रॅली शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. शिवाजीनगर रेल्वे स्टेशन, विष्णू कृपा नगर, महात्मा गांधी वसाहत मार्गे शिवाजीनगर अशी ही रॅली काढण्यात आली.

यावेळी मतदारसंघात जाऊन मतदान जागृती करुन मतदान केंद्रावरील सुविधांबाबत माहिती देण्यात आली. तसेच १०० टक्के मतदान करण्याची शपथ घेण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी घोषणाच्या माध्यमातून जनजागृती संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवला, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गिते यांनी दिली.

See also  प्रितम उपलप यांना पीएच. डी.