काँग्रेसचे बोपोडी येथील पुणे मुंबई दुहेरी रस्ता वाहतुकीस खुला करणेसाठी आंदोलन

बोपोडी : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व बोपोडी, खडकी काँग्रेस ब्लॉक कमिटी तर्फे बोपोडी येथील पुणे मुंबई दुहेरी रस्ता वाहतुकीस खुला करणेसाठी आंदोलन करण्यात आले.


बोपोडी कडून खडकी बाजाराकडे जाणार रस्ता तसेच बोपोडी कडून वाकडेवाडी कडे जाणारा रस्ता गेल्या तीन वर्षांपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद आहे.* *यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत होता तसेच नागरिकांना आर्थिक भुर्दंड देखील बसत होता, याबाबत संबधीत अधिकाऱ्यांना वेळोवेळी भेटून सदरचे दोन्ही रस्ते खुले करण्याबाबत दोन ते तीन वेळा निवेदन दिले आहे तथापि संबधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.यामुळे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, बोपोडी, खडकी काँग्रेस ब्लॉक कमिटी यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.


याप्रसंगी माजी आमदार दीप्तीताई चौधरी, माजी नगरसेवक दत्ताबापूजी बहिरट, माजी नगरसेवक ॲड. नंदलाल धिवार, माजी नरसेविका शैलेजाताई खेडेकर, माजी नगरसेविका रेखाताई गेहलोत, पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्रजी भुतडा, पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस मा. विनोदजी रणपिसे , माजी डि. वाय. एस. पी. अनिलजी पवार , पुणे शहर महिला चिटणीस सुंदरताई ओव्हाळ, सौ. अरुणाताई चेमटे,विमलताई खांडेकर, मायाताई मोरे , अंगिरताई , नाजताई शेख , प्रियांकाताई मधाळे, सौ. अख्तरीताई शेख , सौ. कमलताई गायकवाड, मा. प्रशांतजी टेके, सेलवराज अँथनी, बाबा सय्यद, सचिनजी बहिरट , प्रदीपजी खेडेकर, ॲड. कैलासजी अरुडे, विजयजी कांबळे, मयुरेश गायकवाड , अमरजी गायकवाड, किशोरजी निमक , भरतजी ठाकुर, किशोरजी वाघमारे, नईम शेख , नुर सय्यद, नासीर शेख , अविनाश साठे , इस्माईल पटेल , नईम पठाण, अब्दुल हमिद, हमिद शेख , योगेश पवार , गणेश लांडगे, विकास कांबळे , अमित अगरवाल तसेच पक्षाच्या सर्व प्रमुख महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
कार्यक्रमाचे प्रमुख आयोजन बोपोडी ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष विशाल जाधव व खडकी ब्लॉकचे अध्यक्ष सेल्वराज अँथोनी होते. सदरचे आंदोलन माजी आमदार. दीप्तीताई चौधरी व काँग्रेसचे नेते दत्ताबाप्पू बहिरट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

See also  पाच लाख नवीन कार्यकर्ते जोडण्यासाठी 'आप'ची स्वराज्य संवाद मोहीम