पत्रकार झाला फौजदार सुशांत उपाध्ये यांचे यश

कोल्हापूर : सुशांत उपाध्ये हा तरुण जोतिबाच्या डोंगरावरील रहिवाशी. वडील परंपरागत जोतीबाचे पुजारी. सुशांत मात्र शिकत राहिला. कॉम्पुटर अँप्लिकेशन मध्ये पदवी घेत पुढे त्याने पत्रकारितेत मास्टर्स केले. पुढारीच्या डिजिटल आवृत्तीत उपसंपादक म्हणून काम केलं. झी न्यूज बरोबर ही काम केलं. या सोबत त्याचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु होता. पत्रकारितेतून फौजदारकीत त्याचा प्रवेश झालाय.

नाशिकच्या पोलिस ॲकॅडमीत गुडघ्याची दुखापत सहन करुन, त्याने खडतर ट्रेनिंग पुर्ण केली आहे. काही दिवसांपूर्वी दिक्षांत समारंभ झाला. सुशांतच्या खाकीवर स्टार लागले अन् तो फौजदार झाला. जोतीबाच्या डोंगरावरच्या गरीब पुजारी कुटुंबातला पोरगा प्रथमच मोठ्या पदावर गेला. नागपुरसाठी त्यांची पाहिली जॉईनींग ऑर्डर आली आहे.

सुशांतच्या या यशासाठी खऱ्या अर्थाने त्याचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

See also  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरण१ हजार ९२६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता