औंध मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

औंध : औंध येथे सालाबाद प्रमाणे  तिथीनुसार एक गाव एक शिवजंयती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.

हा सोहळा अत्यंत देखण्या व दिमाखदारपणे साजरा करण्यात आला. याप्रसंगी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजा चा अभिषेक करून या सोहळ्या ची सुरूवात करण्यात आली. त्या नंतर गावातील महिला भजनी मंडळाचे भजन आयोजित केले होते. त्या नंतर सांय.  पारंपारिक पध्दतीने दिमाखदार मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सुरूवतीला महाराजा ची आरती चतुःशृंगी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. कुलकर्णी  यांच्या हस्ते करण्यात आली. त्या नंतर मिरवणुकीला सुरूवात झाली. त्यामध्ये ढोल-ताशा, मर्दानी खेळ, सनई-चौगडा, हलगी या पद्धतीने मोठी भव्य-दिव्य मिरवणुक पार पडली.

तसेच कार्यक्रमाची सांगता शिवरायाची शिववंदना आणि फटाक्या च्या आतिशबाजी करून करण्यात आली. या संपुर्ण कार्यक्रामाचे आयोजन औंधगाव ग्रामस्था कडून करण्यात आले होते.

See also  महाराष्ट्राचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष यात्रा महत्त्वाची ठरली -शरद पवार