बाणेर येथे रूफ टॉप हॉटेल व अनाधिकृत बांधकामावर कारवाई

बाणेर : बाणेर येथे पुणे महानगरपालिकेच्या वतीने रूफ टॉप हॉटेल ,पत्राशेड व अनधिकृत बांधकाम यावर  बांधकाम विकास विभाग झोन ३  यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने धडक कारवाई  करण्यात आली.

सदर कारवाई मधे  सुमारे  11925 चौ.फूट  क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे.कारवाई ठिकाण – हॉटेल इमेज रेस्टोबार , आइस अँड फायर बाणेर हायवे लगत आणि हॉटेल हाईव्ह रांका ज्वेलर्सच्यावर.

सदरची कारवाई पुणे महानगरपालिकेचे  बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता – श्री.श्रीधर येवलेकर साहेब
बांधकाम विभाग झोन क्र.३ चे कार्यकारी अभियंता – श्री जयवंत पवार साहेब यांचे मार्गदर्शनाखालीउप अभियंता – श्री. प्रकाश पवार, कनिष्ठ अभियंता – अजित सणस, संदीप चाबुकस्वार, केतन जाधव वस्टाफ, सहा पोलिस यांच्या पथकाने एक जेसीबी, दोन गॅस कटर, एक ब्रेकर दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई केली.

तसेच बाणेर मधील एकूण 9 रुफ टॉप हॉटेलवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याव्यतिरिक्त दोन हॉटेल वर गुन्हा दाखल करणेसाठी तक्रार देण्यात आली आहे.

See also  बालवडकर प्राथमिक शाळेमध्ये स्कॉलरशिप परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न