मनुस्मृति विरोधात आप महाराष्ट्रभर आंदोलन करणार

पुणे : पुणे आम आदमी पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद डॉ.शोभा खंदारे महासंचालक  यांना निवेदन सादर करण्यात आले

आपण नेमकं ह्या महाराष्ट्राच्या येऊ घातलेल्या यंग जनरेशन ला नेमकं काय शिकवणार आहोत.  25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते. मनुस्मृतित लहानपणी मुलीनं त्यांच्या वडिलांच्या छत्रखाली असावं, लग्नानंतर पतीच्या, पतीचे निधन झाल्यानंतर तिने तिच्या मुलाच्या कृपेवर राहावं पण कोणत्याही परिस्थितीमध्ये महिलेने स्वतंत्र असू नये मनुस्मृतीच्या पाचव्या अध्यायात असा अर्थाचा 148 व श्लोक आहे.
महिलांच्या बाबतीत मनुस्मृती काय सांगते हे या श्लोकावरून स्पष्ट होतं. 154,155,157 अशे अनेक श्लोक महिलांच्या बाबतीत अपमान कारक आहेत त्यामुळे श्लोकांचा कुठलाही समावेश शालेय शिक्षणास घेऊ नये. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांनी मुली तसेच महिला शिकाव्या, आपल्या पायावर उभे राहाव्या यासाठी त्यांनी मनुवाद्यांचा शेणाचा मारा सोसला तसेच सावित्रीबाई यांच्या पाठीशी महात्मा फुले, फातिमा बी शेख यांनी आपलं आयुष्य अर्पण केलं तेव्हा कुठे मुली महिलांमध्ये शिक्षणाची जण जागृती निर्माण झाली. शिक्षणाचा परिणाम म्हणून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आपल्या पायावर उभे राहताना दिसत आहे.

आपल्या भारत देशामध्ये संविधान लागू आहे.संविधान आपल्याला समाजवादी,धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य,समता,बंधुता ,न्याय शिकवतं अभ्यासक्रमामध्ये तुम्ही जातिवादाचे धडे शिकवण्याचा प्रयत्न करू नये असे मत आम आदमी पार्टी पुणे शहराध्यक्ष अनुसूचित जाती प्रशांत कांबळे यांनी व्यक्त केले.अन्यथा याचा आम्ही पूर्ण महाराष्ट्र भर निषेध करू त्यावेळेस सचिव शंकर थोरात, दिगंबर लालसरे, सोमेश्वर साळवे, प्रदीप मदाळकर यदि उपस्थित होते.

See also  राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पांद्वारे (PSP) अपारंपारीक ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस