टेनिक्वाईट (रिंग टेनिस) जागतिक स्पर्धा प्रशिक्षण शिबीरामध्ये पुण्याचे प्रथमेश ढवळे, साहिल खेडेकर, प्रणव पाटील आणि सिध्दि जाधव यांची निवड

पुणे : महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशनच्या माध्यमातून”टेनिक्वाईट (रिंग टेनिस) जागतिक स्पर्धा प्रशिक्षण शिबीरामध्ये पुण्याचे प्रथमेश ढवळे, साहिल खेडेकर, प्रणव पाटील आणि सिध्दि जाधव यांची निवड ” करण्यात आली आहे.


पाचवी जागतिक (वर्ल्ड कप) टेनिक्वाईट स्पर्धा साऊथ आफ्रिका येथे होणार आहे.टेनिक्वाईट फेडरेशन ऑफ इंडिया यांनी श्री.बी.एस.नागराज, श्री . शामसुंदर, श्री. मुरली आणि श्री. अनिल वरपे या सदस्यांची निवड समिती गठीत केली होती.या निवड समितीने संभाव्य २० पुरुष आणि २० महिला निवड केली असून सदर यादीत महाराष्ट्राच्या सहा खेळाडूंची निवड झाली आहे.
१) प्रथमेश ढवळे — पुणे,२) साहिल खेडेकर — पुणे, ३) प्रणव पाटील — पुणे, ४) संजय चेटुले — भंडारा ५) नंदीनी फेंडर — भंडारा ६)सिध्दी जाधव — पुणे. या‌ खेळाडूंचे पहिले प्रशिक्षण शिबीर दिनांक १० मे ते २३ मे २०२३ दरम्यान वेल्लामल इंजिंनियरींग कॉलेज कॅम्पस ,सुरापेठ चेन्नई येथे आयोजित केले आहे.एकूण तीन प्रशिक्षण शिबीरामधून प्रत्येकी आठ खेळाडूंची अंतिम निवड करण्यात येणार असून संघ दिनांक ३० सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ दरम्यान साऊथ आफ्रिका येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. अशी माहिती असोसिएशनचे सेक्रेटरी अनिल वरपे यांनी दिली.

See also  प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जपानच्या प्रधानमंत्री फुमिओ किशिदा यांना दिली खास भेट.